You are currently viewing मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवा – मुख्यमंत्री ठाकरे

मिळालेले घर कोरोना मुक्त ठेवा – मुख्यमंत्री ठाकरे

ओरोस :

 

महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या  ई-गृह प्रवेश कार्यक्रमात स्वतःच्या घरात प्रवेश करणार्‍या लाभार्थ्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतानाच मिळालेले घर कोरोनामुक्त ठेवावे, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन कार्यक्रमास उपस्थिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, महिला व बालविकास सभापती शर्वाणी गावकर आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते चौघा लाभार्थ्यांना प्रतिनिधिक चावीचे घरपत्रक उताराचे  वितरण केले.

हरकुळ बुद्रुक (ता. कणकवली) येथील गजानन श्रीधर घाडीगावकर, नाटाळ ( ता. कणकवली ) येथील संजना सिद्धार्थ तांबे, वर्दे  ( ता. कुडाळ ) येथील मारुती आत्माराम पाताडे, वर्दे  येथील मोहन आत्माराम पाताडे अशी लाभार्थ्यांची नावे आहेत. जिल्ह्यातील तीन हजार  661 घरांना मंजुरी देण्यात आली आहेत. त्यापैकी तीन हजार 646 घरकुलांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. एकूण 2 हजार 948 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 713 प्रगतीपथावर आहेत. तर 278 भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen + one =