You are currently viewing सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना…

सिंधुदुर्गात पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना…

सावंतवाडी

सिंधुदुर्गात प्रत्येक तालुक्यातील पर्यटनाशी संबंधित व्यवसायिकांमध्ये समन्वय साधण्यासाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना करण्यात आली आहे.दरम्यान या संघटनेच्या अध्यक्षपदी बाबा मोंडकर, कार्याध्यक्षपदी सतीश पाटणकर, सचिवपदी नकुल पार्सेकर, तर खजिनदारपदी गुरुनाथ राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली.
या संघटनेची उर्वरित कार्यकारणी पुढील प्रमाणे;

उपाध्यक्षपदी कमलेश चव्हाण (मालवण), बाळू देसाई (वेंगुर्ले), डी.के.सावंत (सावंतवाडी), संतोष काकडे (कणकवली), सुधीर नकाशे (वैभववाडी) दयानंद चौधरी (कुडाळ), संजय सावंत (दोडामार्ग) यांची निवड झाली आहे. तर सोशल मीडिया प्रमुखपदी किशोर दाभोलकर, सहसचिवपदी रोहित आमने, दीनानाथ बांदेकर, संचालकपदी प्रशांत प्रभु-खानोळकर तर सल्लागार पदी बी.आर.वायंगणकर आदींना पदभार देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 15 =