*बांदा केंद्र शाळेच्या चिमुकल्यांची वारकरी दिंडी ठरली लक्षवेधी*
*बांदा
बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत बांदा केंद्रशाळा ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित केलेली वारकरी दिंडी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध वेशभूषेमुळे लक्षवेधी ठरली. विद्यार्थ्यांच्या या वारकरी दिंडी मुळे बांदा शहरात विठ्ठलमय वातावरण निर्माण झाले.
महाराष्ट्रातील पंढरपूर येथे असलेले विठ्ठल मंदिर हे वारकरी संप्रदायायाचे मुख्य ठिकाण आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला मोठी यात्रा असते या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शाळेतील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे माहिती व्हावी यासाठी बांदा गावातील प्रसिद्ध असलेल्या विठ्ठल मंदिरापर्यंत शाळेच्या वतीने या वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वारकरी दिंडीत विद्यार्थी विठ्ठल- रखुमाई , विविध संत व वारकरी यांच्या वेशभूषा करून सहभागी झाले होते.या दिंडीत विद्यार्थ्यांनी केलेला रिंगण सोहळा, फुगड्या आकर्षक ठरल्या.शाळेपासून निघालेली दिंडी गांधी चौकातून विठ्ठल मंदिरात पोचल्यावर विठ्ठल मंदीर देवस्थान कमिटीच्या वतीने दिंडीतील विद्यार्थी व शिक्षकांचे स्वागत करण्यात आले.विठ्ठल मंदीरात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या अभंगगायन,फुगड्यांना उपस्थित विठ्ठल भक्तांची वाहवा मिळाली. ही आनंददायी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर, पदवीधर शिक्षक उदय सावळ,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी, मनिषा मोरे,कृपा कांबळे ,प्रसन्नजित बोचे व पालकांनी यांनी परिश्रम घेतले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*
संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,
संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी
या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.
वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– उच्चशिक्षित प्राध्यापक
– हवेशीर वर्गखोल्या
– परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– १००% नोकरीची हमी
– उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.