मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी!!!!!

मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी!!!!!

 

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांना २१ डिसेंबरला हा कॉल आला होता. त्या महापालिका मुख्यालयात असताना त्यांना हा धमकीचा फोन कॉल आला होता. त्यांनी या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात २१ डिसेंबरला किशोरी पेडणेकर यांना अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. या व्यक्तीने किशोरी पेडणेकर यांना आपले नाव सांगितले नाही मात्र त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फोनवरील ती व्यक्ती हिंदीमध्ये बोलत होती. त्या व्यक्तीने महापौरांना शिवीगाळही केली. संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांना हा फोन कॉल आला होता. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड विधानानुसार कलम ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी कोणतही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा