लोरे नं 2 येथील प्राजक्ता सुतार हिचा कोविड योध्दा म्हणून सन्मान

लोरे नं 2 येथील प्राजक्ता सुतार हिचा कोविड योध्दा म्हणून सन्मान

वाहन चालक मालक सामाजिक संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने
लोरे नं 2 येथील प्राजक्ता सुतार हिचा कोविड योध्दा म्हणून सन्मान

वैभववाडी / संजय शेळके :-

कोरोना महामारीच्या काळात मुंबई शहरात कोरोना व्हायरसचा प्रसार झपाट्याने होत होता .सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेहोते.आरोग्य विभागातील डाँक्टर व कर्मचारी अहोरात्र सेवा देत होते.अशावेळी लोरे नं 2 येथील प्राजक्ता धाकोजी सुतार या आरोग्य सेविकेने रुग्णांची सेवा केली.तिच्या या कर्तृत्वाला सलाम म्हणून वाहन चालक मालक सामाजिक संघ ,सिंधुदुर्ग यांच्या वतीने तिला कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

लोरे नं 2 तालुका वैभववाडी येथील सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मलेल्या या तरुणीने कोरोना महामारीच्या काळात मुंबई येथील सेव्हन हिल येथे कोरोना बाधित रुग्णांना आरोग्यची सेवा देत असताना स्वतः कोरोना पॉझिटिव झाली, मात्र कोरोना पॉझिटिव्ह होऊन त्यानंतर काही दिवसात कोरोनावर तिने मात केली.आपण जनसेवा करावी या हेतूने तिने पुन्हा खाजगी तत्वावर नायर हॉस्पिटल मुंबई येते रुग्णांना सेवा देत आहे. ग्रामीण भागातील तरुणी मुंबई सारख्या मोठया शहरात चांगले काम करत आहे.तिने भविष्यात जोमाने काम करावे या हेतूने वाहक चालक मालक सामाजिक संघ सिंधुदुर्ग यांच्या वतीने तिचा कोविड योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले .

प्राजक्ताचे वडील धाकोजी सुतार हे वाहन चालक सामाजिक संघाचे सदस्य ,तसेच एकात्मता वारकरी सांप्रदाय कोकण, दिंडीचे कार्यकारिणी सदस्य आहेत. तिचे प्राथमिक शिक्षण भारत विद्या मंदिर लोरे व माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय लोरे येथे झाले .बारावीपर्यंत तिने आचिरने येथील सायन्स कॉलेज येथे शिक्षण घेतले.त्यानंतर मेडिकल कॉलेज नायर मुंबई येते जी.एन.एम (General Nursingmidwifery).B.Y.L.Ch Nair hospital school of nursing mumbai central हा नर्सिंगचा तीन वर्षाचा कोर्स तिने पूर्ण केला .मार्च महिन्याच्या सुरुवातीला सेव्हन हिल येथील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस सुरू केली.

दरम्यान प्राजक्ता सुतार हिला कोरोनाचा संसर्ग झाला .तिच्यावर उपचार करून ती कोरोनावर मात केली.सध्या ती नायर हॉस्पिटलमध्ये गेले पाच महिने खाजगी आरोग्य सेविका म्हणून काम करत आहे. तिचा लोरे येथील घरी नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी चालक वाहन चालक मालक सामाजिक संघ सिंधुदुर्ग चे जिल्हा संपर्कप्रमुख राजेश पडवळ ,वैभववाडी तालुकाध्यक्ष देविदास सावंत,प्रसाद गजोबार, पांडुरंग सुतार, बाळकृष्ण कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा