You are currently viewing साऊथ झोन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता बाळकृष्ण पेडणेकर ..

साऊथ झोन ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता बाळकृष्ण पेडणेकर ..

मुक्ताई ॲकॅडमच्या खेळाडूंचे मोठे यश….

सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील शालेय विदयार्थ्यांना आणि बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र साऊथ झोन ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी करण्यात आले. चेज सर्कलचे संचालक इंटरनॅशनल आर्बिटर विवेक सोहनी यांच्या आयोजनाखाली कै.अनिल जे.कानविंदे स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी एकूण रोख रक्कम रु. १० हजारची ७५ बक्षिसे ठेवण्यात आली होती. यासाठी सावंतवाडीतील मुक्ताई ॲकॅडमीचे संचालक आणि बुदधिबळ व कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांचे सहकार्य लाभले.
स्पर्धेत सावंतवाडीचा मुक्ताई ॲकॅडमीचा १५ वर्षीय राष्ट्रीय खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. प्रदिप पाटील, गायत्री राठोड, विभव राऊळ, प्रथमेश फाटक यांनी दोन ते पाच क्रमांकाची बक्षिसे मिळवली.११ वर्षाखालील गटात प्रथम सुश्रुत नानल, द्वितीय प्रणव पाटील, १५ वर्षाखालील गटात प्रथम – राजेश विरनोडकर, द्वितीय – चिन्मय मराठे, महिला गटात घनिष्ठा राणे यांनी बक्षिसे मिळवली. विशेष म्हणजे मुख्य गटातील बाळकृष्ण पेडणेकर, विभव राऊळ या राष्ट्रीय खेळाडूंसह इतर गटातील सर्व बक्षिसे मुक्ताई ॲकॅडमीच्या विदयार्थ्यांनी मिळवली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापुर,
सांगली, सातारा, सोलापुर जिल्ह्यातील १०८ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७२ स्पर्धकांनी नावनोंदणी केली. त्यापैकी ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला.विशेष म्हणजे २३ विदयार्थी, विदयार्थिनी पहिल्यांदाच ऑनलाईन स्पर्धेत सहभागी झाले. विजेत्यांना रोख बक्षिसे आणि आकर्षक ई-सर्टिफिकेट देण्यात आली. सर्व सहभागी स्पर्धकांना ई-सर्टिफिकेट देण्यात आली.
जिल्ह्यातील बुदधिबळ खेळाडूंना ऑनलाईन बुदधिबळ स्पर्धा खेळण्याचा छान अनुभव घेता आला. लवकरच जिल्हास्तरीय ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा घेणार असल्याचे कौस्तुभ पेडणेकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + thirteen =