You are currently viewing संबंधित ठेकेदाराकडून रेडी बंदर काढून घेण्याची मागणी करणार- सत्यजीत तांबेंचा इशारा

संबंधित ठेकेदाराकडून रेडी बंदर काढून घेण्याची मागणी करणार- सत्यजीत तांबेंचा इशारा

जिल्ह्यातील तीन्ही विधानसभा लढवण्याची तयारी…

सावंतवाडी

रेडी बंदराची जबाबदारी घेतलेल्या संबंधित ठेकेदाराकडून म्हणावे तसे काम झाले नाही.त्याने परिसरात काहीही सुधारणा केलेली नाही. स्थानिकांना रोजगार दिलेला नाही.त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून ते बंदर काढून घेण्यात यावे, अशी मागणी मी पक्षाच्या माध्यमातून बंदर विकास मंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिला. दरम्यान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही जागा काँग्रेस लढणार आहे. तशी आमची तयारी सुरू आहे, महाविकास आघाडी असली, तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी निवडणुका सुद्धा स्वबळावर लढणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी आयोजित युवक काँग्रेसच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, रेडी बंदराचे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्याच्याकडून बंदराचा हवा तसा विकास झालेला नाही. तर त्या ठिकाणी स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र तोही त्या ठिकाणी निर्माण झाला नाही. त्यामुळे त्या बंदराचा विकास होण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून बंदर काढून घेणेच योग्य होईल, तशी मागणी आपण बंदर विकास मंत्र्यांकडे करू,असेही ते म्हणाले. दरम्यान येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. आणि या निवडणुकांमध्ये प्राधान्याने युवकांना संधी दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 13 =