You are currently viewing ग्रामीण भागाच्या विकासात आमदार नितेश राणे यांचे मोठे योगदान – निलमताई राणे

ग्रामीण भागाच्या विकासात आमदार नितेश राणे यांचे मोठे योगदान – निलमताई राणे

मतदारसंघात विविध प्रकल्प मार्गी याचा आनंद खूप : विकासात महिला पदाधिकारी यांची उत्तम साथ

वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ संपन्न

वैभववाडी
मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी आमदार नितेश राणे दिवस-रात्र मेहनत घेत आहे. विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असणाऱ्या नितेशने ग्रामीण भागात विविध विधायक प्रकल्प मार्गी लावले आहेत. त्याने मतदारसंघात केलेली कामे पाहून खूप आनंद वाटतो. इतर पदाधिकाऱ्यांबरोबर मतदारसंघातील महिला पदाधिकारी यांची आमदारांना मोठी साथ मिळाली आहे. यापुढेही त्यांच्या मागे खंबीर उभे राहून त्यांना पाठबळ द्या. असे प्रतिपादन एसएसपीएम संस्थेच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांनी व्यक्त केले.

वैभववाडी भाजपा महिला मोर्चा आयोजित हळदीकुंकू समारंभ येथील पक्ष कार्यालयात पार पडला. यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, नगरसेविका साक्षी सावंत, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, सभापती अक्षता डाफळे, नगराध्यक्षा समिता कुडाळकर, प्राची तावडे, शुभांगी पवार, भारती रावराणे, विद्या पाटील, स्नेहलता चोरगे, हर्षदा हरयाण, सीमा नानिवडेकर व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

निलम राणे म्हणाल्या, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे पहिल्यांदा आमदार झाले. तो काळ आजही आठवतो. त्याच पद्धतीने आमदार नितेश आज काम करत आहे. त्याला दुसऱ्यांदा तूम्ही भरभरुन मतदान करून निवडून दिलात. त्याच्या पाठीशी यापुढेही खंबीर उभे रहा असे सांगितले. संध्या तेरसे म्हणाल्या, आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघातील विकास पाहून परदेशात गेल्यासारखे वाटते. अशा कार्यसम्राट आमदारांची सर्वांनी काळजी घ्या असे सांगितले. शारदा कांबळे यांनी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. वैभववाडी महिला मोर्चाच्या वतीने निलम राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी निलम राणे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, रोहन रावराणे, किशोर दळवी, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, प्रदीप नारकर, दाजी पाटणकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा