You are currently viewing प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन….

प्रदेश भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने शिवगान स्पर्धेचे आयोजन….

स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे जिल्हा संयोजक बाळ पुराणिक यांचे आवाहन

सावंतवाडी

महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी च्या सांस्कृतिक सेलच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिवगान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हा स्तरावर आणि अंतिम फेरी राज्य स्तरावर होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही फेरी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजता कुडाळ येथील बॅ. नाथ पै महाविद्यालय येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेत प्राथमिक फेरी साठी वैयक्तिक पारितोषिक अनुक्रमे ५ हजार, ३ हजार, व २ हजार तर सांघिक पारितोषिक अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख प्रतिभा चव्हाण 8552013599 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक बाळ पुराणिक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + eleven =