सावंतवाडी समाज मंदिर बाजूच्या इमारतीला दरवाजे नसल्याने प्रशिक्षण घेत असलेल्या दिव्यांग मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला.
सावंतवाडी
साहस प्रतिष्ठान दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी हे प्रशिक्षण केंद्र सुरुवातीला सावंतवाडी शिरोडा नाका येथील ज्येष्ठ नागरिक इमारतीमध्ये गेल्या काही वर्षापासून सुरू होतं परंतु त्या इमारतीची दुरुस्ती होणार असल्याकारणाने नगरपरिषदेने प्रतिष्ठानला सदरची जागा खाली करण्यासाठी सांगितली. त्यानंतर कित्येक दिवस 30 ते 35 दिव्यांग मुलं प्रशिक्षणापासून वंचित राहिली. दिव्यांग मुलांचे शिक्षण थांबू नये याकरिता संस्थेच्या सदस्या रुपा गौंडर (मुद्राळे) यांनी दिव्यांग मुलांना प्रशिक्षणासाठीl जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले अखेर शेवटी त्यांनी समाज मंदिर येथील बाजूच्या इमारतीमधील रिकामा असलेला एका खोलीमध्ये मुलांच्या प्रशिक्षणासाठी जागा मिळावी याकरिता तेथील माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांची भेट घेतली. तेव्हा वाडकर यांनी लगेचच दिव्यांग मुलांच्या प्रशिक्षणासाठी सदरची जागा उपलब्ध करून दिली होती परंतु काही दिवसानंतर सदर इमारतीचे दरवाजे तुटून पडल्याने सदर इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी गुरे व कुत्रे बसू लागले.
दोन दिवसापूर्वी वर्गामध्ये दिव्यांग मुलं प्रशिक्षणघेत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने दिव्यांग मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षकांच्या सतर्कतेमुळे फार मोठा अनर्थ टळला.
तसेच इमारतीमधील संडास बाथरूम पूर्णपणे मोडकळीला आले आहे त्यामुळे दिव्यांग मुलांचे खूप हाल होत आहेत तसेच इमारतीच्या परिसरामध्ये रोज उष्ट-खरकटात,बॉटल्स तसेच मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे या सर्व समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही व्हावी याकरिता संस्थेच्या सदस्या रूपाली गौंडर (मुद्राळे) यांनी पुन्हा एकदा माजी नगरसेवक तानाजी वाडकर यांचा लक्ष वेधून सदर समस्यांची कल्पना दिली असता त्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करून लवकरात लवकर इमारतीचे दरवाजे व बाथरूमची दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन दिले.
______________________________
*संवाद मीडिया*
*करिअरमध्ये नवा टप्पा! -*
*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*
*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*
*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*
*🔹 पद:*
*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*
*🔹 कामाचे स्वरूप:*
*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*
*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*
*🔹 लोकेशन्स:*
*कुडाळ / सावंतवाडी*
*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*
*फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*
*स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*
*उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*
*आकर्षक बेस पगार*
*कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*
*प्रशिक्षण कालावधीतही वेतन*
*🔹 संपर्क व अर्ज:*
*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*
*🔹 पत्ता:*
*शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*
*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*
*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमचा उज्ज्वल करिअर सुरू करा!*

