*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अमिता जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावळे विठाई*
सावळे विठाई
भक्तांची आई
गाव तिचे पंढरी
चंद्रभागेच्या तीरी…..
पाय ते विटेवरी
कर ते कटावरी
गोपीचंदन उटी
तुळशीहार कंठी……..
श्वासागणिक जपले
भक्तांनी नाम जिथे
धावून गेला झणी
भक्त पुकारता तो जगजेठी……
🌹🌹🌹🌹🌹🌹
*|| *विठ्ठल विठ्ठल
जय हरी* ||*
अमिता जोशी