You are currently viewing वेंगुर्ला-मठ येथे एसटी रस्त्यावरून घसरली, प्रवासी सुदैवाने बचावले…

वेंगुर्ला-मठ येथे एसटी रस्त्यावरून घसरली, प्रवासी सुदैवाने बचावले…

वेंगुर्ला-मठ येथे एसटी रस्त्यावरून घसरली, प्रवासी सुदैवाने बचावले…

वेंगुर्ला

कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील मठ येथे धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात एसटी रस्त्यावरून बाजूला घसरली. चालकाने प्रसंगावधान राखत बस वेळीच थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. यात बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळहून वेंगुर्ल्याच्या दिशेने जाणारी एसटी बस मठ येथील वळणावर आली असता समोरून येणाऱ्या वाहनाला रस्ता देण्यासाठी चालकाने बस रस्त्याच्या बाजूला घेतली असता बस रस्त्याच्या कडेला घसरली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस पूर्णपणे बाजूला जाण्यापूर्वीच थांबवण्यात यश आले. यामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचला. या घटनेमुळे या मार्गावरील वळणांवर असलेल्या झाडांच्या फांद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकदा या धोकादायक फांद्यांमुळे अपघात घडतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी या धोकादायक फांद्या तात्काळ छाटण्याची मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा