You are currently viewing इचलकरंजीत मूक पदयात्रा काढून छञपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता

इचलकरंजीत मूक पदयात्रा काढून छञपती संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास अंतर्गत श्री शिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे नुकताच मूक पदयात्रा काढून मासाची सांगता करण्यात आली.ही मूक पदयात्रा शहराच्या मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून सुरु होऊन शहराच्या मुख्य रस्त्यावर नेण्यात आली. या पदयात्रेत शिवशंभू प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इचलकरंजी शहरात गेल्या काही वर्षांपासून श्री शिवप्रतिष्ठान संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्यात येतो. यानिमित्त महिनाभर शहरातील अनेक भागात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाच्या गाथा तसेच प्रार्थना केल्या जातात. बलिदान मास काळात शहरातील अनेक युवकांनी आपल्या आवडत्या पदार्थाचा त्याग केला होता.
शुक्रवारी दुपारी वढूबुद्रुक येथून आणलेली ज्वाला जवाहर तांबडा ,ॲडव्होकेट समीर मुदगल ,मलकारी लवटे ,उमेश पाटील यांच्या हस्ते
प्रज्वलित करण्यात आली.तसेच ध्वजपूजनही करण्यात आले.
यानंतर प्रेरणा मंत्र घेवून मंगलधाम जवळील गणेश मंदिर येथून मूक पदयात्रेस प्रारंभ करण्यात आले. ही पदयात्रा चांदणी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, शिवतीर्थ, कॉ. के. एल. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे झेंडा चौक येथून गणेश मंदिर येथे आणण्यात आली. यानंतर सांगलीचे हरिहरराव कानवडे यांनी सहभागी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. छत्रपती संभाजी सुर्यहृदयव ध्येयमंत्र घेवून समारोप करण्यात आला.
या मूक पदयात्रेत प्रसाद जाधव, मंगेश मस्कर, महेश घोरपडे, अक्षय वणगे, दीपक कुंभार, संतोष डफळे, बालाजी गौड, अजित आवळकर , नागेश पाटील
यांच्यासह शिवशंभू प्रेमी
शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
दरम्यान, श्री शिवप्रतिष्ठान संघटनेच्यावतीने शुक्रवारी सकाळीही मूक पदयात्रा काढण्यात आली होती. प्रारंभी ध्वज पूजन करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी दिलेले बलिदान व त्यांची न निघालेली अंत्ययात्रा हे लक्षात घेऊन हजारो धारकरी या मूकपदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =