*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भावभक्ती…*
वारी निघाली निघाली निघाली पंढरी
तेथे भेटेल भेटेल भेटेल श्रीहरी..
श्रीहरी शेजारी शेजारी शेजारी रखूमाई
विट घेतली घेतली श्रीहरीने पायी…
कान्होपात्राने पात्राने दिलीत दुषणे
श्रीहरी मिरवी मिरवी अंगी आभुषणे
प्राण त्यजिले त्यजिले हरिच्या त्या पायी
तुझे म्हणवितो म्हणवितो तुला लाज नाही…
जनी भांडते भांडते दळीते दळण
हरि भरतो भरतो भरतो रांजण
जनी धुविते कपडे वाळवितो श्रीहरी
पाणी भरतो भरतो नाथाघरी हरी…
केले आपले आपले भक्तांनी देवास
नाथाघरी हो देवाचा नित्याचा निवास
जनी गोवऱ्या थापिते पांडुरंग ध्वनी
हाडे बोलती चोख्याची विठ्ठल अंगणी…
भावभक्ती हो पावते पावते देवाला
कर्म चुकले चुकले चुकले ना कुणा
नाही बदलत प्राक्तन दु:ख नाही जात
दु:ख घालवा घालवा विठ्ठल भजनात…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)