*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्री हरी विठ्ठल*
श्री हरी विठ्ठला, मुखी नाम घेता
तुझे पांडुरंगा, हरे सारी भवचिंता।
कधी भेटशी देवा, तू श्री पांडुरंगा
आळवितो तुज रोज नव्याअभंगा।
यावे वाटे जीवा, तुज भेटण्यासाठी
परी चालू कैसे, हाती धरवेनाकाठी
मनी करोनिया जप, पाहे तव रूप
नेत्री दिसे तुझे दिव्यतेज विश्वरूप
किती आठवू तुज प्रेमळ मायबापा
रात्रंदिन नाम ओठी,देवा कर कृपा
जन्मलो जगी या,कर्तव्याची जाण
कृतज्ञतेचे देणे, याची नको वाण
नको सोसणे, भोगणे दिसेपैलतीर
सावळ्याविठ्ठला तवदर्शना आतुर
आलो थांब देवा अनंगा,पंढरपुरी
नको आता ठेवू तुझ्या पासुनि दूरी
आलो विठ्ठलागे देवाथांब क्षणभरी
तवकृपेच्या सागरी, मायेच्यामाहेरी
रचना
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
मुंबई विरार