व्ही.एन.नाबरच्या छोट्या वारकर्यांनी दिंडी घालून सांस्कृतिक वारसा जपण्याचा दिला मोलाचा सल्ला.
बांदा
आषाढी एकादशी म्हणजे डोळ्यांसमोर येतो तो वारक-यांचा प्रचंड जनसमुदाय, विठ्ठल नामाचा जयघोष,टाळ मृदुगांचा गजर,ज्ञानोबा-माऊली- तुकाराम हे स्वर,भोळ्या भक्तांची माऊलीच्या दर्शनासाठी असलेली आस, विठ्ठल रखुमाईंचे भक्तांना वाटणारे मनोहर रुप.आषाढ महिन्याच्या शुक्लपक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात.’पाय जमिनीवर ठेवून आकाशी उंच उडावे’ या उक्तीप्रमाणे,बांदा पंचक्रोशीतील नाबर शाळा ही इंग्रजी माध्यमाची शाळा असूनही आपले संस्कार व संस्कृती नेहमीच जपण्यात अग्रेसर असते.तेच संस्कार पुढील पीढीला देत आपल्या यशाची शिखरे पादाक्रांत करत असते.याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे,नाबरच्या छोट्या वारकऱ्यांनी आषाढी देवशयनी एकादशीच्या पुर्वसंध्येला खानोलकरनगर ते कट्टा काॅर्नर व नंतर गांधी चौकातील विठ्ठल-रखुमाई मंदिरपर्यंत पावसाची तमा न बाळगता काढलेली पदयात्रा स्वरूप दिंडीचे सार्थक झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
दरवर्षीची प्रथा यावर्षीही जपत शाळेच्या शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई तसेच वारकऱ्यांच्या पारंपरिक वेषात,डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात दिंडी पताका,गळ्यात तुळशीमाळ,टाळ मृदुंगाच्या गजरात विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवत नामजप करत संपूर्ण बांदा नगरी विठ्ठलमय केली.विठ्ठलाच्या वेशातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी कुमार रिदीतराव लक्ष्मण गावडे व रखुमाईचा वेष परिधान केलेली इयत्ता चौथीची विद्यार्थ्यांनी कुमारी सिद्धी सुभाष प्रभू शिरोडकर.
यांनी विठ्ठल रखुमाईच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मंदिराच्या देखरेख कमिटीतील सदस्यांनी औक्षण करून मंदिरात घेतले.तदनंतर मंदिरातील विठ्ठल रखुमाईंचे सर्वांनी दर्शन घेतले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी फुगड्या सादर केल्या व विठ्ठल नामघोष करत हरिनामाचा जप केला.
आणि विद्यार्थ्यांनी रिंगण सादर केले.
तेथे सर्वांसाठी चहापानाची सोय करण्यात आली होती.
यावेळी उपमुख्याध्यापिका सौ.शिल्पा कोरगावकर व इतर सर्व शिक्षक तिथे उपस्थित होते.
नाबर शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदा ने त्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले.