वेंगुर्ले-भटवाडी येथे एसटी व कॅन्टरच्या झालेल्या अपघातात दोघे जखमी…
वेंगुर्ला
वेंगुर्ले येथून कुडाळकडे जाणारी एसटी बस आणि वेंगुर्ले कडे येणारा कॅन्टर या दोन गाड्यांमध्ये वेंगुर्ले भटवाडी येथे मुख्य रस्त्यावर समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचे समोरील बाजूचे नुकसान झाले असून दोघेजण जखमी झाले आहेत. अपघात आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला.
वेंगुर्ले आगाराची बस कुडाळ च्या दिशेने जात होती. तर त्याच दरम्यान कॅन्टर वेंगुर्ले च्या दिशेने येत होता. भटवाडी येथे दोन्ही गाड्या समोरासमोर धडकल्या आणि अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.