*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम बालकविता*
*थंडीचा गारवा*
हूडहूड हूड हूड
करते थंडी
बाहेर काढा
स्वेटर बंडी
सगळीकडे
धुकेच धुके
झाडें पाने
झाली मुके
शेतं भिजली
दंवात सारी
घमघम त्यांचा
सुटला भारी
गारठून गेली
चिमणी पाखरे
बंद झाले
त्यांचे नखरे
चुली बाजूला
शेकतंय कोण
मनी माऊ
दुसरं कोण?
धुक्यात हरवले
अंगण रस्ते
स्वप्ना सारखे
सारे दिसते
श्रीनिवास गडकरी
पुणे बावधन
@ सर्व हक्क सुरक्षित
नावासहितच पुढे पाठवावे