You are currently viewing जिल्हा बँकेच्या ठेवीदारांसाठी खूशखबर; मुदत ठेवींच्या व्याजदरामध्ये वाढ.

जिल्हा बँकेच्या ठेवीदारांसाठी खूशखबर; मुदत ठेवींच्या व्याजदरामध्ये वाढ.

सिंधुदुर्ग

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने आपला नावलौकिक सातत्याने राखलेला आहे. बँकेच्या ठेवीदारांना त्यांचे गरजेनुरूप वेगवेगळ्या ठेव योजना बँकेकडून सातत्याने राबविल्या जातात.
येत्या श्रीगणेश चतुर्थी पासून बँकेने मुदत ठेवीच्या व्याजदरामध्ये ०.२५% ते ०.५०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील अन्य बँकांच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर ठेवीदारांना देण्याचा बँकेचा नेहमीच प्रयत्न असतो. जेष्ठ नागरिक तसेच सर्व सभासद संस्थांना नियमित व्याजदरापेक्षा ०.५०% वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे. सदर वाढीव ठेव व्याजदराचा फायदा बँकेच्या सर्व प्रकारच्या मुदत ठेवीदारांना होणार असून त्याचा लाभ बँकेच्या सर्व ठेवीदार ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा