You are currently viewing जन्म मरण

जन्म मरण

*जन्म मरण*

कठीण असतो जन्म घेणे,
मरण अगदी सोपे,
यातना जन्म मरणाच्या,
आपणा कमी दुसऱ्या वाटे.

परावलंबी तो जन्म आपुला,
दुसऱ्या पोटी जन्म होतो.
परावलंबी मरणही झाले,
खांदावर तिसऱ्या विसावतो.

वेदना देऊनी जन्म घेतला,
ओठी हास्य फुलवतो.
जन्मा येऊनी सार्थक झाले,
गर्वच जणू मनास वाटतो.

क्षणभंगूर ते जीवन जगूनी,
क्षणात मरण कवटाळतो.
माणूस म्हणूनी जगला होता,
जीव जाताच प्रेत होतो.

कठीण असतो जन्म घेणे…

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 3 =