You are currently viewing डायरी

डायरी

कॉलेजच्या जीवनातली,
डायरी मला सापडली.
धूळ तिच्यावर जमलेली,
मी हातानेच झाडून टाकली.

पहिलं पान उघडताच,
बरंच काही आठवलं.
डोळे मिटून पाहिलं,
होतं मनात सर्व साठवलं.

शब्द शब्द माझाच मला,
जणू नवखा भासला.
आठवणीही पुसल्या होत्या,
पडला होता बराच फासला.

कविता चारोळ्या वाचून,
डोळ्यात अश्रू उभे राहिले.
पूर्वी हसताना मी कधीतरी,
हेच अश्रू होते आनंदी पाहिले.

प्रत्येक पान उलगडले तेव्हा,
वाटले हे काल परवाच घडले.
आठवणींच्या सोबत मी सुद्धा,
भूतकाळात जाऊन खूप रडले.

डायरी माझी कित्येक वर्षे,
जुन्या जखमा घेऊन जगली.
जुन्या आठवांची रद्दी सुद्धा,
आज मोत्याहून महागली.

आताही जपून ठेवते तिला,
हृदयाच्या एका कप्प्यात.
काय सांगावं कधी सुख देईल,
आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात..

(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =