You are currently viewing हे सृष्टीच्या निर्मात्या

हे सृष्टीच्या निर्मात्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसूरकर लिखित अप्रतिम प्रार्थना*

*हे सृष्टीच्या निर्मात्या*

हे सृष्टीच्या निर्मात्या, तुला माझा नमस्कार
तूच भाग्यविधाता ,केले स्वप्न तू साकार ॥ धृ ॥

रूप तुझे पाहण्या, बघ आतुरले मन
चरणी वाहिले मी, देवा तन मन धन
अस्तित्वाचा तुझ्या, मज झाला साक्षात्कार
तूच भाग्यविधाता केले स्वप्न तू साकार!! १!!

तुझ्या कृपेचे छत्र, तू धरीले आम्हावरी
दु:खाच्या या छायेला, अलगद दूर करी
ऐकूनी धाविला तू, माझी आर्त ही पुकार
तूच भाग्यविधाता, केले स्वप्न तू साकार!! २!!

फुलला मळा भक्तीचा, झाला त्यावर तू राजी
सुखाच्या सुमनांनी ही, ओंजळ भरली माझी
त्रिभुवनी घुमतो ,तुझ्या नामाचा ललकार
तूच भाग्यविधाता, केले स्वप्न तू साकार!! ३!!

*✒️©सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 2 =