श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने ४ जुलैला बापूसाहेब महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन
.
सावंतवाडी
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार ता. ४ जुलैला सकाळी १० वाजता बापूसाहेब महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील उपस्थित राहून “प्रशासकीय सेवेतील संधी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी “खेमराज” या वार्षिक अंकाचे प्रकाशन होणार आहे. त्यामुळे सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.