You are currently viewing चिपी ते कवठी ११ केव्ही लाईनचे काम पूर्ण

चिपी ते कवठी ११ केव्ही लाईनचे काम पूर्ण

आमदार निलेश राणे यांचे कवठी ग्रामस्थांनी मानले आभार..

कुडाळ :

गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेलं चिपी ते कवठी या ११ केव्ही लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश राणे यांचयाजवळ ही जोडणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती त्या नुसार ही जोडणी पूर्ण झाली असून कवठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच स्वाती करलकर, शिवसेना कार्यकर्ते मनीष वाडयेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा