*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”जगन्नाथाचा रथ”*
जगन्नाथ पुरी वैष्णवांचे मोठे तीर्थस्थान
विश्वातील भाविकांचे शांति श्रद्धास्थानIIधृII
मंदिर बांधकाम सुरू झाले बाराव्या शतकांत
सुरू केले अनंतवर्मन चोडगंगा देवांनं
राजा अनंगभीम देवानं केले काम पूर्णII1II
भगवंतासाठी मंदिर बांधले राजा इंद्रद्युम्नानं
प्रतिमा तयार केल्या देव शिल्पी विश्वकर्मानं
श्रद्धा संस्कृती इतिहास गुढ विलक्षण मिश्रणII2II
भगवान विष्णूचा अवतार कृष्ण भगवान
मोठा बंधू बलभद्र देवी सुभद्रा बहीण
पूजा करतात त्रिकाळ सर्वांची नित्यनेमानं II3II
काष्ठ कलेवर मूर्ती बारा वर्षांनी बदलतात
मानती रहस्य कृष्णाचे हृदय पावते कंपन
वैश्विक देवतांची पूजा पद्धती राहे प्राचीनII4II
मुख्य घुमटाची सावली अदृश्य स्वरूपांत
शिखर ध्वज फडके वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं
पक्षी रहित अष्ट धातु चक्र वाटे निरखतंII5II
बलभद्रांचा तालध्वज सुभद्रांचा दर्पदलन
जगन्नाथांचा नंदीघोष प्रतिवर्षी होतो रथ
करती जय जगन्नाथ हरी बोल तुतारी शंख नादII6II
जगन्नाथाची रथयात्रा आहे विश्व प्रसिद्ध
पापे नष्ट होती मोक्ष मिळे रथ ओढल्यानं
मिळते हजारो यज्ञांचे पुण्य सर्वांना प्रसादII7II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.