You are currently viewing व्हॅलेंटाईन का? कशासाठी?

व्हॅलेंटाईन का? कशासाठी?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*व्हॅलेंटाईन का? कशासाठी?*

 

अजून नाही कळले मला ।

व्हॅलेंटाईन कोठून आला ।।

उंबरठ्या आतील प्रेमाला।

रस्त्यावर का घेऊन गेला? ।।

भावनांना व्यक्त करण्या।

लागतो का मुहूर्त कोणा ।।

सदना आतील प्रेमाला ।

आणले बाहेर कशाला?।।

प्रेम भावना व्यक्त करण्या ।

परदेशी स्मरण कशाला ।।

पुराणांतरी केले तप ।

पार्वतीस महादेव प्राप्त ।।

नायक महाभारताचा ।

ईश जणू रूप -शौर्याचा ।।

हृदय वाहिले कृष्णाला ।

पत्र पाठवले तयाला ।।

मनानेच वरिले शौर्या ।

कृष्ण रुक्मिणी डे करावा ।।

हा तोच तो दिवस होता ।

पुलवामाच्या हौतात्म्याचा ।।

सीमेवरील सेनेसाठी ।

पळभर थांबून पुष्पांजली वहा ।।

 

 

विद्या रानडे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + one =