You are currently viewing सुखाच्या पायघड्या
सुखाच्या पायघड्या

सुखाच्या पायघड्या

सुखाच्या पायघड्या
घातल्या मी तुजसाठी
तुडवून गेलीस तू दूर,
वेडं मन माझं नादान.

सुख वेचण्या चोच दिली,
पंखास तुझ्या दिलं बळ.
खुल्या आसमंतात आलं,
तव इच्छांना उधाण.

उंच भरारी घेता तू,
जाहले आकाशही ठेंगणे.
उंच उंच शिखरेही तुझं,
आता भासू लागली लहान.

घाव हृदयावर पडताच तुझे,
दुःख जाहले अनावर.
सांग मना घालू कसा,
मी आवर तरी निदान?

(दीपी)
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine − seven =