सावंतवाडी :
सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात शोध व बचावचे काम करून अपघातग्रस्त व प्रशासनाला सहकार्य करणारे सह्याद्री ऍडव्हेंचर व रेस्कु ग्रुप आंबोली सांगेलीच्या मेंबर साठी चांदा ते बांदा योजना, जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग यांचेमार्फत, आपत्कालीन बचाव साहित्याचे वितरण दिपक केसरकर यांच्या हस्ते मनीष दळवी – सिंधुदुर्ग बॅंक अध्यक्ष, एनडीआरएफ कमांडर आर जे यादव, निवासी जिल्हाधिकारी मच्छिन्द्र सुकटे तथा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या साहित्यमुळे सह्याद्री ऍडव्हेंचर व रेस्कु ग्रुप आंबोली सांगेलीचे मेंबर शोध व बचाव कार्य करताना स्वतःची योग्य पद्धतीने काळजी घेऊन प्रशासनाला व अपघातग्रासताना सहकार्य करणार आहेत.
सह्याद्री ऍडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली सांगेली चे आंबोली घाट परिसरात जेव्हा जेव्हा अपघात होतात तेव्हा तेव्हा नेमहीच फार मोठे योगदान असते. ह्या टीम चे मेंबर कोणतीही शासकीय मोबदला न घेता निःस्वार्थ व अविरत पणे जनसेवेचे हे काम करत आहे.
या टीम व प्रशासनाला ला हे शोध व बचाव चे साहित्य येणाऱ्या काळात खूप सहकार्य करणारे असणार आहे, एखाद्या शोध व बचाव टीमला एवढ्या मोठया प्रमाणात शोध व बचाव साहित्य उपलब्ध करून देण्याची कदाचित ही पहिलीच घटना असणार म्हणून त्यांना हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेले आ. दीपक केसरकर व पालकमंत्री नितेश राणे व महायुती सरकार चे सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी आभार मानले आहेत.