You are currently viewing मी सावरकर यांचा अनुयायी म्‍हणून काम करणार – नितेश राणे

मी सावरकर यांचा अनुयायी म्‍हणून काम करणार – नितेश राणे

कणकवली

सावरकर यांना माफी वीर बोलणं चुकीचे आहे. माझे यापूर्वी वीर सावरकर काही गैरसमज होते,तसे ट्विट मिळतील. काही विरोधक त्याची चर्चा करत आहेत. पण मला सावरकर यांच्याबद्दल चुकीची माहिती काहींनी दिल्यामुळे काही चुकीचं समज मला होता. मी अभिमानाने सांगतो, यापुढे विर सावरकर यांचा मी अनुयायी म्हणून काम करणार आहे,असे प्रतिपादन आ.नितेश राणे यांनी केले.

कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सावरकर गौरव यात्रा समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळीआ.नितेश राणे म्हणाले, आम्ही सरकार विरोधात आंदोलन केल्यामुळे अनेकदा आत टाकण्यात आले. आम्हाला ६ तास तुरुंगात राहताना कठीण होते. मात्र वीर सावरकर यांनी आपल्या जीवनात भोगलेल्या तुरुंगवास आणि त्यांनी निर्माण केलेलं आदर्श आम्ही विसरु शकणार नाही. त्या तुरुंगाच्या खोलीत सावरकर राहिले. देशाबद्दल योगदान दिले त्या वीर सावरकर यांच्या बद्दल राहुल गांधी यांनी माफी वीर बोलणं चुकीचे आहे. त्यांनी किमान स्वतःच्या आजीने सावरकर यांना काय म्हटलं, फिरोज गांधी यांनी म्हटलं ते वाचल्यानंतर राहुल गांधी तसे केव्हाच म्हणणार नाहीत.

राणे म्‍हणाले, महाराष्ट्र राज्यात सावरकर गौरव यात्रा निमित्ताने जे वातावरण निर्माण झालं आहे. ते पाहून भाजपाच्या नेत्याचे आभार मानतो. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील ही यात्रेत सहभाग घेतलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकारने हिंदू काय आहे हे आज या यात्रेेतून दाखवून दिले आहे. सावरकर यांचा गौरव यात्रा आपल्या सर्वांच्या अभिमानाची आहे. डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ब्रिटिशांनी सावरकर यांना ५९ वर्षाची शिक्षा सुनावली. त्यांना ६ वर्षे कडक कोठडी सुनावली गेली, कुणालाही न भेटता रहावं लागलं. अनेक प्रकारची शिक्षा भोगावी लागली. १० वर्षे सक्त कारावास भोगावा लागला. त्याच्या कर्तुत्वाला ही यात्रा काढत न्याय देण्याचा प्रयत्न आ.नितेश राणे यांनी केला. हिंदुदुत्वाचा मुद्दा जिथे जिथे आला तिथे आ.नितेश राणे धावले.सावरकर हे विज्ञानवादी होते.राष्ट्रीय सुरक्षेसाठी दिलेले सल्ले सर्वच खरे ठरले आहेत.त्यांना वाचले पाहिजे,त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा