You are currently viewing आई वडिलांचे छत्र हरपलेल्या माणगावच्या दिव्यांग भगिनी रेश्मा संभाजी कदम विवाह बंधनात

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या माणगावच्या दिव्यांग भगिनी रेश्मा संभाजी कदम विवाह बंधनात

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या माणगावच्या दिव्यांग भगिनी रेश्मा संभाजी कदम विवाह बंधनात

कुडाळ

माणगाव ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथील रेश्मा संभाजी कदम या 80 टक्के दिव्यांग भगिनीचा विवाह सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल शिंगाडे यांच्या पुढाकाराने व पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री मोरे यांच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यातील नितीन जय गावकर यांच्याशी 26 जून रोजी सदाशिव पेठ विठ्ठल मंदिर पुणे या विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह संपन्न झाला. यासाठी सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल या संस्थेचे संस्था अध्यक्ष श्री . अनिल शिंगाडे यांनी विवाह स्थळी नेण्यापासून ते विवाह साठी लागणाऱ्या सर्व जबाबदाऱ्या पालकत्वाच्या नात्याने पार पाडल्या. त्यांच्यासोबत श्री.सुनील जाधव हे सहभागी झाले होते.यापूर्वी श्री. अनिल शिंगाडे यांनी आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या रेश्मा कदम या भगिनीला वेळोवेळी दिव्यांगांसाठी असणाऱ्या सेवा सुविधा अन्न, निवारा यासारख्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी सहकार्य केलेले होते. आता खऱ्या अर्थाने तिचे जीवन समृद्ध झाले आहे. जिल्ह्यातील साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही वेळोवेळी दिव्यांग बांधवांसाठी मायेचा आपुलकीचा हात देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करते.आणिआज रेश्मा कदम हिचा विवाह संपन्न करून एक आदर्श समाजासमोर ठेवला आहे. रेश्मा कदम हिच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा