You are currently viewing म. रा. प्रा. शि. भारती शाखा कणकवली आयोजित कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न….

म. रा. प्रा. शि. भारती शाखा कणकवली आयोजित कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न….

कणकवली

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच तळेरे नंबर १ तालुका कणकवली या शाळेमध्ये संपन्न झाला . संघटनेच्यावतीने कोरना योद्धा म्हणून ज्यांनी कोरोना आजाराच्या प्रार्दुभावाच्या कालावधीत कणकवली तालुक्यामध्ये विशेष सामाजिक, आणि शैक्षणिक उपक्रम राबवून एक उत्कृष्ट समाजातील जनसेवक असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले. ते म्हणजे दिलीप तळेकर माजी सभापती पंचायत समिती कणकवली तथा अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तरळे यांचा शिक्षक भारती शाखा कणकवली च्या वतीने कोरोना योद्धा म्हणून मानाचे सन्मानपत्र, शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व कणकवली तालुका अध्यक्ष दशरथ शिंगारे यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना कोरोना आजाराचा प्रादुर्भाव माझ्या घरात होऊ नही या वेळी मी न डगमगता आपल्या सर्वांच्या साथीने धैर्याने तोंड दिले . कणकवली तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रेम करून राबवलेल्या विविध उपक्रमांना साथ दिली त्यामुळे आज माझ्या हातून काम होऊ शकले. विशेष म्हणजे शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्याने राबवून महाराष्ट्र राज्यामध्ये एक ऑफलाइन शिक्षणाचा वेगळा पॅटर्न निर्माण केला .त्याप्रसंगी आपण सर्व शिक्षकांनी मोलाची साथ दिलात ,त्याबद्दल तुम्हा सर्व शिक्षकांना धन्यवाद .शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या करिता ज्यावेळी माझे सहकार्य लागेल ते मी सहकार्य देऊ इच्छितो .तसेच शिक्षक भारती संघटनेच्या विधायक सर्व उपक्रमांत माझ्या शुभेच्या राहतील .ज्या वेळेला माझी तुम्हाला गरज असेल त्यावेळी मी तुम्हाला निश्चित साथ देईन ,अशा प्रकारची ग्वाही दिली . संघटनेच्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती , संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सिंधुदुर्ग , किसन दुखंडे राज्य संघटक, दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष कणकवली ,स्मिता कोरगावकर महिला जिल्हाध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला .यावेळी दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष, संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष , दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष, लवू पाटील जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कोचरेकर तालुकाध्यक्ष मालवण, यांनी प्राथमिक स्वरूपात संघटनेच्यावतीने दिलीप तळेकर यांच्या कार्याची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लहू पाटील जिल्हा उपाध्यक्ष, सातवसे जिल्हा प्रतिनिधी, बागवे जिल्हा प्रतिनिधी, संतोष कोचरेकर तालुका मालवण, सखाराम झोरे सरचिटणीस दोडामार्ग, सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न श्रीराम विभुते सरचिटणीस कणकवली, मंगेश खांबळकर कार्याध्यक्ष ,मदन कुमार नारागुडे तालुका प्रसिद्धीप्रमुख ,शशिकांत तांबे तालुका उपाध्यक्ष , संजय कोळी मुख्य संघटक ,कल्पना सावंत अध्यक्ष महिला आघाडी कणकवली, अनुजा रावराणे तालुका संघटक कल्पना सावंत , कोमल दुखंडे उपाध्यक्ष ,सखाराम खरात कोषाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ शिंगारे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश खांबळकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + thirteen =