मुंबई :
राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना आज वाढदिवसानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देत त्यांचे अभीष्टचिंतन केले. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम जनतेचे प्रेम व शुभेच्छांचा वर्षाव घेत मंत्री नितेश राणे मुंबईत परतले. यावेळी त्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले.