You are currently viewing मेढा येथे कासवाच्या पिल्लांना सोडले समुद्रात…

मेढा येथे कासवाच्या पिल्लांना सोडले समुद्रात…

मेढा येथे कासवाच्या पिल्लांना सोडले समुद्रात…

मालवण

मालवण मेढा येथील समुद्र किनारी ऑलीव्ह रीडले कासवाच्या संरक्षित करून ठेवलेल्या अंड्यांमधून आज पिल्ले बाहेर आल्यावर या पिल्लांना कासव मित्र कीर्तिदा तारी व करण कुबल व यांच्यासह सहकाऱ्यांनी समुद्रात सोडले. यावेळी ६५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.

मालवण मेढा येथील कीर्तिदा तारी यांच्या घरानजीकच्या समुद्र किनाऱ्यावर दि. ३१ जानेवारी रोजी ऑलीव्ह रीडले कासवाने अंडी घातली होती. कासवाने अंडी घातल्याचे समजताच कासवमित्र कीर्तिदा तारी व करण कुबल यांनी वन विभागाचे अधिकारी श्री. परीट व श्री. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंडी घातलेल्या ठिकाणी जाळ्याचे छोटे कुंपण करत ही अंडी संरक्षित करून ठेवली होती. यानंतर आज ५० दिवसानंतर संरक्षित करून ठेवलेल्या जागेतून कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागल्याने कीर्तिदा तारी व करण कुबल यांनी त्याठिकाणची वाळू बाजूला करत अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिल्लांना सुरक्षित बाहेर काढत त्यांना पाण्यात ठेवले. तर काही अंडी अजूनही सुस्थितीत आहेत. अंड्यांमधून बाहेर आलेल्या ६५ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा