You are currently viewing १ ऑक्टोबरला बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कट्टा कॉर्नरच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

१ ऑक्टोबरला बांदा सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कट्टा कॉर्नरच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन

बांदा:

 

१ ऑक्टोबरला सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ कट्टा कॉर्नर बांदाच्या वतीने रात्रौ ८ वाजता खुली फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर २ ऑक्टोबरला चित्रकला व रंगभरण स्पर्धा आणि भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शालेय विद्यार्थी आणि स्थानिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कट्टा कॉर्नर नवरात्रोत्सव मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते.

१ ऑक्टोबरला सायंकाळी ४.३० वाजता खास महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर रात्रौ ८ वाजता १ ली ते ५ वी आणि ६ वी ते १० वी अशा दोन गटात खुल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता खुल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंगलदास साळगावकर ९४२३३१८७६६ यांच्याशी संपर्क साधावा. तर खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेसाठी अभय नाईक ९८६०८११०२६, समीर सातार्डेकर- ९५६१०५६९९९, साईप्रसाद काणेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =