You are currently viewing रव रव गुंजारव

रव रव गुंजारव

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी प्राध्यापक डॉ. जी. आर. उर्फ प्रवीण जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*रव रव गुंजारव*

 

रव रव गुंजारव

चांद्र भूमी मधुप रव

जलवंती रसवंती

मधुकोषी आरव रव

 

सळसळती घडो घडी

चाखी मधुरस गोडी

कळी पाकळी उघडी

मुक्यानेच तो बडबडी

 

फुल फुले फुलवंती

भ्रमर गुज एकांती

पाचू बेट मखमली

स्पर्श काया दृष्टांती

 

कठो काठ चिंब ओठी

ओल भिजे नदी काठी

दाट मोती रान दाटी

सर्व काही जीवासाठी

 

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगांव

कॉपी राईट 13 मे 24

प्रतिक्रिया व्यक्त करा