सिंधुदुर्ग व वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग च्या सर्व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक संपन्न
कुडाळ
कुडाळ येथे श्री. अशोक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग व वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग च्या सर्व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली.
कामगार मित्रांनो सदर बैठक ही आपल्याच भविष्यातील येणाऱ्या दैनंदिन जीवनातील प्रश्नांबाबत व समस्या सोडविण्यासाठी होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे यामध्ये कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे. तरी जेंव्हा संघटनेकडून आपणांस काही सुचना वरिष्ठांच्या आदेशावरून येतात तेंव्हा त्यांचे तंतोतन पालन करणे आवश्यक असते, असो काल सर्व पदाधिकारी यांच्या सहमतीने व चर्चे अंती हे ठरविण्यात आले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, (संलग्न भारतीय मजदूर संघ) सिंधुदुर्ग च्याच झेंड्याखाली आपणांस काम करावयाचे आहे.यावेळी वीज कंत्राटी कामगार संघटना सिंधुदुर्ग – संस्थापक अध्यक्ष श्री.संदीप बांदेकर, रुपेश पवार रुपेश यादव सर्वेश राऊत व सर्व सहकाऱ्यांसोबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ,( संलग्न भारतीय मजदूर संघ) या संघटनेत सर्व सहकाऱ्यांसोबत प्रवेश केला. वीज कंत्राटी कामगार संघ.सिंधुदुर्ग सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले.
येत्या दिवसात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग ची नवीन कार्यकारिणी निवडण्यात येणार असून थोडेफार खांदापलट करण्यात येणार असून नवीन कंत्राटी कामगारांना तालुक्यातील संघटनेची जबाबदारी देण्यात येणार आहे.तसेच संघटना सर्व पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन संघटनेची पुढील ध्येयधोरणे कामगारांपर्यंत पोहोचवणार आहेत.
जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांनासाठी आज एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेतला आहे. यावेळी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड, श्री.संदीप बांदेकर, श्री. सर्वेश राऊळ श्री. महेश राऊळ,श्री. संजय गोवेकर, श्री. लोकेश सांगवेकर, श्री. राजू दळवी, श्री. दर्शन देसाई, श्री. प्रितेश हळदणकर, श्री. चेतन, श्री. बांधीवडेकर श्री. सिद्धू न्हावी श्री. दिनेश तांबे श्री. रुपेश पवार श्री. रुपेश जाधव व सर्व सहकारी उपस्थित होते.
कामगार एकजुटीचा विजय असो.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ,
जिल्हा संघटक
महेश राऊळ
महाराष्ट्र कंत्राटी कामगार संघ, सिंधुदुर्ग
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩