You are currently viewing क्षात्रकुलोत्पन्न मराठा गावडे समाजाचा वधू वर मेळावा १४ एप्रिल रोजी

क्षात्रकुलोत्पन्न मराठा गावडे समाजाचा वधू वर मेळावा १४ एप्रिल रोजी

मालवण
वायरी मालवण येथील लोकनेते आर.जी.चव्हाण मंगल कार्यालय आणि उद्योजक ,सामाजिक कार्यकर्ते श्री. गोविंद उर्फ आप्पा चव्हाण यांच्या संकल्पनेतून क्षात्रकुलोत्पन्न मराठा ( गावडे ) समाजाचा वधू – वर मेळावा शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वा ते १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे .

या वधू-वर मेळाव्याविषयी माहीती देताना सामाजिक कार्यकर्ते आपा चव्हाण म्हणाले, ज्या समाजात आपण जन्मतो त्या समाजाचे आपण काही ना काही देणं लागत असतो. ही सामाजिक बांधिलकी ओळखून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात प्रवेश व नोंदणी विनामूल्य असून सकाळी मोफत अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे या मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या वधू-वरानी आपल्या बायोडाटासह इच्छुक वधू- वर आणि त्यांचे पालकांनी उपस्थित रहाणे अपेक्षित असून इच्छुकानी गुरूवार दि.१३ एप्रिल पर्यंत आपली नाव नोंदणी मोबाईल क्रमांक ९४२३८०६३०८/ ९४०३९४६८५४ यावर संपर्क साधावा तरी या सेवाभावी उपक्रमाला समाजातील वधू – वरांनी व समाजातील मांन्यवरांनी उपस्थित राहून आपलाही सहभाग दर्शवून हा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन श्री.गोविंद उर्फ आप्पा चव्हाण यांनी केले आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + nine =