*गुरुवारी प्राधिकरणात संस्कृतीचा वारी रिंगण सोहळा*
पिंपरी
श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, भक्ती – शक्ती प्रासादिक दिंडी, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५:०० ते ७:३० या कालावधीत प्राधिकरणामध्ये प्रथमच संस्कृतीचा वारी रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, निगडी प्राधिकरणात हा सोहळा संपन्न संपन्न होणार असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठांचा मानसपुत्र चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे यांनी केले आहे.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२