You are currently viewing भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत आयोजित दिवाळी बाजाराचा उद्या शुभारंभ

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत आयोजित दिवाळी बाजाराचा उद्या शुभारंभ

28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

स्थानिक व्यवसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कणकवली पेट्रोल पंपाच्या समोरील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आयोजित करण्यात आलेल्या कणकवली नगरपंचायत दिवाळी बाजार चे उद्घाटन उद्या 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी खासदार व भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दिवाळी बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीनिमित्त घरोघरी लावण्यात येणारे आकाश कंदील हे कणकवलीतील कुंभार बांधवांनी मातीच्या सहायाने बनविलेले असणार आहेत. तसेच घरगुती बनविलेले अन्य आकाश कंदील देखील येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच या ठिकाणी कुंभार बांधवाकडून मातीद्वारे बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू लाईव्ह पहाता येणार आहेत. तर कणकवली शहरातील बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या दिवाळीच्या फराळाच्या अनेक घरगुती वस्तू देखील या दिवाळी बाजारात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी कणकवली नगरपंचायत चे सर्व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 3 =