You are currently viewing शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न..!

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग उत्साहात संपन्न..!

जळगाव (बबनराव वि.आराख)

डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली या प्रसंगी सर्वप्रथम आमदाबाद, गुजरात येथे झालेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना फाउंडेशन तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर यांनी सभेचे विषय वाचून दाखवले त्यामध्ये मागील विषयावर चर्चा करण्यात आली तसेच कल्यान येथील संमेलना संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली तसेच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर हे नुकतेच नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप गोसावी नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय भेटणारे आदि पदाधिकारी सोबत होते याप्रसंगी प्रा. डॉ.संदीप गोसावी यांच्या महाविद्यालयातील मध्ये भेट देऊन त्या ठिकाणी तेथील प्राध्यापक कांबळे यांनी डॉ.उज्जैनकर यांचा शाल देऊन सत्कार केला त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी मठामध्ये जाऊन पुढील संमेलनाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी नियोजन करण्यात आले त्रंबकेश्वरचे चौथे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन हे १३ डिसेंबर २०२५ रोजी नियोजित करण्यात आले. याप्रसंगी महंत १००८ महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांच्या साकोरे बेजे येथील नयनरम्य आश्रमामध्ये जाऊन श्री विजय असणारे यांनी त्यांचे दर्शन घेतले तसेच याप्रसंगी डॉ.उज्जैनकर यांनी स्वामींचा शाल, श्रीफळ, आदिशक्ती संत मुक्ताईचा फोटो व हरी पाठाची पुस्तिका भेट देऊन सत्कार केला तसेच स्वामींनी सुद्धा डॉ.उज्जैनकर यांना त्यांचे स्वलिखित गुरु ग्रंथ भेट दिला याप्रसंगी उज्जैनकर यांनी त्यांच्याशी संमेलनाच्या संदर्भात चर्चा केली व त्यांनी सकारात्मक होकार देऊन संमेलन यशस्वी करूया असा सुद्धा संदेश दिला. तसेच श्री अंबाबाई बहुउद्देशीय सेवा आणि संस्था अमरावती तर्फे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांना नुकताच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचा ठराव मांडून सर्वांनी शाहीर यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले त्याचप्रमाणे जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पुणे येथील रामचंद्र गुरव यांनी त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त रक्तदान केले त्याबद्दल सुद्धा डॉ. उज्जैनकर यांनी त्यांचा अभिनंदन सत्कार मांडून सर्वांनीच त्यांचे टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले प्रसंगी सर्व उपस्थित विविध जिल्हा पदाधिकारी राज्य कार्यकारणी व राज्य नियोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केले. तसेच कल्याण संमेलनासाठी जिल्हा कार्यकारिणीने ६०० रुपये विभागीय कार्यकारणीने ७०० रुपये राज्य नियोजन समितीचे १००० रुपये व राज्य कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचे १००० रुपये अशाप्रकारे संमेलनाची आर्थिक मदत फाउंडेशनच्या क्यू आर कोडवर लवकरात लवकर टाकण्याचे डॉ. उज्जैनकर यांनी यावेळी सर्वांना विनंती केली. याप्रसंगी फाउंडेशनचे गोवा राज्य संपर्कप्रमुख ॲड अजितसिंह राणे फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सुभाष बागल राज्य सचिव छत्रपती संभाजीनगर येथील एडवोकेट सर्जेराव साळवे राज्य संपर्कप्रमुख अकोला येथील डॉ.अशोक शिरसाठ राज्य समन्वयक मुंबई येथील सौ.लताताई गुठे राज्य सल्लागार अकोला येथील श्री तुळशीराम बोबडे साहेब राज्य संघटक पुणे येथील डॉ.निशिकांत धुमाळ राज्य सचिव कोल्हापूर येथील डॉ. मा. ग.गुरव राज्य खजिनदार साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे तथा राज्य प्रसिद्धी प्रमुख श्री बबनजी आराख सर विदर्भ विभागीय अध्यक्ष प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख श्री पांडुरंग दैवत साहेब बुलढाणा जिल्हा समन्वयक श्री बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार धुळे जिल्हा अध्यक्ष श्री अश्विन अमृतकर सर पश्चिम महाराष्ट्र मेघाताई पाटील महाराष्ट्र विभागीय सचिव पुणे येथे श्री रामचंद्र गुरव साहेब पश्चिम महाराष्ट्र विभागीय प्रसिद्धी प्रमुख आळंदी येथील ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज हिंगणकर ठाणे जिल्हा समन्वयक बदलापूर येथील श्री रमेशभाऊ उज्जैनकर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री मधुकर पोतदार साहेब जळगाव जिल्हा संघटक भुसावळ येथील श्री ज्ञानदेव इंगळे नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रशांत रणसूरे सर नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय इटणारे आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी या सभेचे आभार उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव श्री गणेश कोळी सर यांनी मानले. याप्रसंगी शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य कार्यकारिणी, राज्य नियोजन समितीचे पदाधिकारी ,विविध जिल्हा, विभागीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा