You are currently viewing माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे कणकवलीत पडसाद

माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याचे कणकवलीत पडसाद

छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावत हल्ल्याचा केला निषेध

कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व रत्नागिरी चे आमदार उदय सामंत यांच्यावर पुणे कात्रज येथील चौकात झालेल्या हल्ल्याचा कणकवलीत निषेध करण्यात आला. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करत असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेला हा बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो वरील बाजूस लावले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाचे प्रवक्ते माजी पालकमंत्री व सावंतवाडी चे आमदार दीपक केसरकर यांचे देखील फोटो या बॅनरवर लावले आहेत. शिवसेना सिंधुदुर्ग असा या बॅनर वरती उल्लेख करण्यात आला आहे. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कणकवलीत देखील पडसाद उमटले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा