*शाळेचा पहिला दिवस*
देवगड –
महाळुंगे येथील राणेवाडी जिल्हा परिषद शाळेतील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळेतील पहिल्या दिवशी विध्यार्त्याचे स्वागत मोठया उत्साहात आणि जलोषपुर्ण वातावरण करण्यात आले, शाळेत आलेल्या सर्व मुलांना औक्षण करण्यात आले त्यांच्यावर पुष्पवृस्टी करण्यात आली तसेच पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या पहिल्या पाहुलाचे ठसे मुलांना आठवण जपण्यासाठी देण्यात आले.
या स्वागत समारंभाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप राणे व मुख्याध्यापक सुनील मांजरेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली, नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले यानंतर मान्यवर उपस्थित्यांच्या हस्ते सर्व मुलांना गणवेश व शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले यावेळी प्रकाश राणे, अनिल सावंत, प्रविण सावंत, सुजाता यादव, तांबे सर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रकाश वाडकर यांनी केले तर आभार सुरेखा मोहिते यांनी मानले