अमरावती :
अमरावती येथिल श्री अंबाई बहूउद्देशिय सेवाभावी संस्था अमरावतीच्या वतीने राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा – 2025 चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये सदर पुरस्कार वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. क्षितीज पॅलेस हॉल मध्ये हा पुरस्कार गौरव सोहळा संपन्न झाला.
सौ. माधुरी सचिन चव्हाण संस्थापक, अध्यक्षा,अंबाई बहू उद्देशीय सेवाभावी संस्था अमरावती यांच्या वतीने प्रथमच पुण्यश्लोक आहिल्या बाई होळकर राज्य स्तरीय कार्य गौरव पुरस्कार -2025 सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मा. गणेशजी शिंदे साहेब उपआयुक्त अमरावती, तसेच आमदार मा सौ. सुलभाताई खोडके, कमलाताई गवई, लेडी गव्हर्णर, डॉ. मनिष शंकर गवई, जनसंपर्क अधिकारी,केंद्रीय न्याय व सामाजिक मंत्री भारत सरकार तसेच मराठी ‘नाळ’ या चित्रपटाचे बालयुवक कलाकार श्रीकांत पोकळे ‘आणि इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर राज्य स्तरीय कार्य गौरव पुरस्कार, केळवद येथिल रहिवासी कवी, शाहीर, लेखक, मनोहर पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य भरातून अनेक समाज सेवक विविध कार्य करणारे सेवाभावी उपस्थित होते.
कवी, शाहीर मनोहर पवार केळवदकर यांनी साहित्य शाहीरी कला काव्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले असून महाराष्ट्रभर त्यांचे कार्य सुरु आहे. तसेच त्यांना शासनाचे संस्थांचे विविध पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचे कार्य अविरत सुरु असून सामाजिक कार्य, साहित्यिक चळवळ, तसेच कलाक्षेत्रात त्यांनी विविध जिल्हयात सहभाग नोंदविला असून ते विविध सामाजिक संघटन, पदाधिकारी आहेत. कवी मनोहर पवार यांनीअनेक काव्य, पोवाडे, अभंग, लावणी, शाहीरी फटके आदी काव्यप्रकार लिहीले असून ते विविध प्रसार माध्यमात सातत्याने लिखाण करीत असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात घूमान, पंजाब प्रांतात सहभाग नोंदविला आहे . तसेच चित्रपट नाट्य अभिनय करीत आहेत. चित्रपट महामंडाळाचे सदस्य असून शासनाचे मानधन प्राप्त शाहीर कलावंत आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म घेवून ते समाज कार्य करीत आहे. या पूर्वीही अनेक राज्यस्तर पुरस्कार गौरवाचे ते मानकरी ठरले असून अहोरात्र लेखन सेवा सुरु आहे.