दोडामार्ग शहरातील रस्त्यांवरील काढलेले गतिरोधक आठ दिवसात घातले नाहीत तर रस्ता रोको आंदोलन….
नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर यांनी दिला इशारा
दोडामार्ग
कसर्ई दोडामार्ग शहरातील दोडामार्ग ते आयी तसेच इतर ठिकाणी असलेले गतिरोधक नवीन डांबरीकरण करताना काढले आहेत. यामुळे पुन्हा सुसाट वाहने हाकली जातात यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. शिवाय रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात जीर्ण झाडे वाकून खाली आली आहेत ती तोडावी , आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर रस्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा नगरपंचायत स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, शिवसेना शहर प्रमुख योगेश महाले, युवक राष्ट्रवादी काँग्रेस, गौतम महाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग याना दिला आहे.
दोडामार्ग शहरातील आयी रस्त्यावर जिल्हा परिषद शाळा, धाटवाडी येथे गतिरोधक होते यामुळे शाळकरी मुले नागरिक यांना पायी चालत जाणे वाहनाचा वेग कमी झाल्याने सोयीस्कर होते. पण नवीन डांबरीकरण केले यावेळी गतिरोधक घातले नाही. होते ते काढले यामुळे अनेक वाहने सुसाट सोडली जात आहेत. यामुळे धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ताब्यात असलेल्या रस्ता दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे वाकून खाली आली आहेत. पावसाळ्यात पडून अपघात होऊ शकतात तेव्हा तातडीने ती तोडावी अशी मागणी केली आहे. आठ दिवसात कार्यवाही झाली नाही तर होणाऱ्या परिणामास बांधकाम विभाग जबाबदार राहील असे म्हटले आहे.