You are currently viewing “सोलापूर गोवा फ्लाय९१” च्या विमानसेवेचा आज शुभारंभ..

“सोलापूर गोवा फ्लाय९१” च्या विमानसेवेचा आज शुभारंभ..

गोवा / पणजी :

गोवा येथील ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सोलापूर गोवा अशी नवी विमानसेवा आजपासून सुरू केली आहे. या सेवेमुळे सोलापूर हे फ्लाय ९१ च्या वेगाने विस्तारणाऱ्या नेटवर्कमधील आठवे गंतव्यस्थान ठरले आहे. सोलापूर विमानतळावर फ्लाय ९१ च्या उद्घाटन उड्डाणाचा शुभारंभ सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते औपचारिक रित्या हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, स्थानिक आमदार, सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि फ्लाय ९१ चे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा