You are currently viewing चाईल्ड लाईनच्या वतीने सावंतवाडीतील जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

चाईल्ड लाईनच्या वतीने सावंतवाडीतील जि. प. शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप.

सावंतवाडी

अटल प्रतिष्ठान संचलित चाईल्ड लाईन सावंतवाडीच्या वतीने सावंतवाडी, बाहेरचा वाडा जिल्हा परिषद शाळा नंबर सातच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप अटल प्रतिष्ठानचे खजिनदार व माजी सैनिक श्री महादेव लिंगवत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष व चाईल्ड लाईनचे संचालक अॅड. नकुल पार्सेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील काही शाळांचा सर्वे करून ज्या शाळामध्ये काही गरजू मुले असतील अशा अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपं करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृगनयना सावंत, सहशिक्षक श्री अरविंद कुडतरकर, सहशिक्षका सौ. नुतन गुरव, सौ. ऐश्वर्या सावंत, चाईल्ड लाईनच्या समन्वयक कु. पुनम पार्सेकर, टिम मेंबर श्रीमती प्रज्ञा तांबे, श्री विश्वनाथ सनाम, श्री रामचंद्र भराडी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × one =