उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी १५ जून पर्यंत गुणपत्रिकेच्या प्रति उपलब्ध करून देण्याचे समाजातर्फे आवाहन
कुडाळ : परब-मराठा समाजातर्फे दहावी, बारावी परीक्षेत प्रथम तीन आलेल्या विद्यार्थ्यांना परब मराठा समाज सिंधुदुर्गचे प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे. २२ जून २०२५ रोजी कुडाळ येथील मराठा समाज हॉल मध्ये सकाळी १० ते १ या वेळेत हा विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हयातील परब मराठा समाजातील ज्या विद्यार्थ्यांना बारावीत ६५ टक्के, व दहावीत ७० टक्के गुण मिळाले असतील, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी १५ जून पर्यंत गुणपत्रिकेच्या दोन छायांकित प्रती उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन परब-मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे करण्यात आले आहे. गुणपत्रिकेच्यामागे आपले संपूर्ण नाव, पत्ता, शाळेचे नाव व व्हॉट्सअँप नंबर देणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी देवगड तालुका मनोहर परब ९४०४१६२१८८, वैभववाडी तसेच वाडी तालुका- शैलेद्रकुमार परब, कणकवली तालुका- सुशील परब, सुनील परब, सुहास पान शॉप, कणकवली, कुडाळ तालुका- आर.एल.परब, आनंद परब- आकेरी, मालवण तालुका- गुरुदास परब, विवेक परब, चिंदर, जे. बी, परब तिरवडे, सावंतवाडी तालुका- नारायण परब सावंतवाडी, दोडामार्ग तालुका- संतोष परब बांदा, प्रवीण परब कुंब्रल, वेंगुर्ला तालुका- प्रज्ञा परब, आपा परब, तुळस या नंबरवर शालेय विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन परब मराठा समाज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने केले आहे.