You are currently viewing माणुसकी हरपलीयं

माणुसकी हरपलीयं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा आरंभ कला साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अमिता जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*माणुसकी हरपलीयं*

*******************

 

माणुसकी हरवली

कारण मने दुरावली

प्रत्यक्ष भेटीची आता

मजाच नाही उरली…..

संभाषणे आता सारी

फोन पुरतीच उरली

एकत्र येऊन आनंदाची

व्याख्याच नाही उरली…

प्रत्येकाचे वेगळे विश्व

चार भिंतीत संपले

गरज म्हणून कार्यालय

गाठणे भाग पडले….

स्वतःतच रमला माणूस इतका

दुसऱ्यांचे सुख, दुःख कधी ना दिसले

मदतीचा ,आधाराचा हात आखडता

मन भावनाशून्य झाले..

पैसा कमावला कितीही

माणूसच लागतो गरजेला

सुख साजरे करायला

तर दुःखात अश्रू पुसायला……

 

*******************

अमिता जोशी

मिरा रोड,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा