*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बदलती जीवनशैली*
बदलली जीवनशैली
आज आमच्या देशात
जुने सारे काळाआड
वारे नवीन घरात
बदलती जीवन शैलीं
रीत नवी वागण्याची
मन होते अचंबित
तऱ्हा पहा विचारांची
जग सारेच दिखाऊ
कुणी कुणाचा नसतो
स्वार्थासाठी खोटी नाती
जो तो आपले पाहतो
खानपान वेशभूषा
बदले नीती नियम
नेमधर्म , आचरण
नाही माहीत संयम
भारतीय संस्कृतीचा
असणार अभिमान
जरी बदलली शैली
सांभाळू भारत शान
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३

