You are currently viewing पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा –   पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण

पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा –   पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण

पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करा –   पालकमंत्री रविंद्र चव्‍हाण

सिंधुदुर्गनगरी

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या कामात मोनोपॉली करुन सिंधुदुर्ग सारख्या पर्यटन जिल्ह्याला वेठीस धरणाऱ्या ठेकेदारांची शिवाय अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाई करा, असे आदेश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

            पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, माजी आमदार राजन तेली उपस्थित होते.

            कार्यकारी अभियंता रत्नाकर बामणे यांनी आढावा दिला. यानंतर पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, चार-चार वेळेला निविदा काढूनही जर कोणी ठेकेदार निविदेसाठी येत नसेल तर, या जिल्ह्याला वेठीस धरणारा प्रकार आहे. ठेकेदारांची मोनोपॉली दिसून येते. अशा ठेकेदारांची आणि त्यांना मदत करणारे अधिकारी यांची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी.

            ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची सूचनाही यावेळी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांनी केली.

०००००

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =